धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील शासकीय सिव्हिल रुग्णालयात एमआरआय मशिन नसल्यामुळे गरजू व गोरगरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. बाहेर खासगी रुग्णालयात एमआरआय करणे हे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे असल्याने, गरीब नागरिकांना चंदा गोळा करून उपचार घेण्याची वेळ येत होती. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजवादी पक्षाचे माजी नगरसेवक अमीन अब्दुल करीम पटेल यांनी सुमारे सहा महिने आधी ठामपणे आंदोलन छेडले होते.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या आंदोलनानंतर अमीन पटेल यांनी सातत्याने सिव्हिल रुग्णालयाला भेटी देत या कामाच्या प्रगतीची पाहणी केली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर शासनाने धुळे सिव्हिल रुग्णालयात एमआरआय मशिन बसविण्यास मंजुरी दिली. या कामासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे.
याप्रसंगी रुग्णालयातील सर्जन यांनी अमीन अब्दुल करीम पटेल यांना खास आमंत्रित करून एमआरआय मशिन बसवण्याच्या कामाची सविस्तर माहिती दिली आणि कामाचा संपूर्ण आढावा त्यांना दाखवला. ठेकेदाराला हे काम पूर्ण करण्यासाठी शासनाने सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे.
![]() |
- Advertisement - |
या दौऱ्याच्या वेळी समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये अख्लाक अहमद, अमीन अब्दुल करीम पटेल, अब्दुल हफीज अब्दुल हक, शकील हवाई जहाज, आसिफ भाई, मसूद वेल्डर, कुर्बान अंसारी, सादिक भाई यांचा समावेश होता.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
एमआरआय मशिन उपलब्ध झाल्यानंतर धुळे शहरातील सामान्य नागरिकांना अल्प दरात निदानाची सुविधा उपलब्ध होणार आहे. समाजवादी पक्षाच्या या यशस्वी आंदोलनामुळे शहरातील रुग्णसेवेमध्ये मोलाची भर पडणार आहे.