धुळे दर्पण न्यूज :- धुळे येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला विभागातील सर्व व्यवहार गुरुवार, दिनांक १९ जून २०२५ रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. बाजार समितीचे सभापती यशवंत दामु खैरनार यांनी याबाबत अधिकृत जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
ही सूचनाः द धुलिया व्हेजीटेबल मर्चन्टस् अॅण्ड कमिशन एजंट्स असोसिएशन, धुळे यांनी दिलेल्या लेखी पत्राच्या अनुषंगाने देण्यात आली आहे. त्यानुसार, भाजीपाला बाजारातील एक नामांकित ज्येष्ठ आडते व्यापारी कै. श्रीचंद छेतीया यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या सन्मानार्थ आणि श्रद्धांजली म्हणून दिनांक १९ जून रोजी भाजीपाला बाजार पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.
![]() |
- Advertisement - |
या दिवशी बाजार समिती अंतर्गत कोणतेही खरेदी-विक्री व्यवहार होणार नाहीत. तसेच, तमाम भाजीपाला उत्पादक शेतकरी, अनुज्ञप्तीधारी आडते, व्यापारी आणि इतर संबंधित घटकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी या दिवशी आपला भाजीपाला बाजारात विक्रीस आणू नये.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
सभापती खैरनार यांनी स्पष्ट केले आहे की, बाजार समिती आणि संपूर्ण व्यापारी वर्ग कै. श्रीचंद छेतीया यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करीत आहे. त्यांनी बाजार समितीच्या कार्यात मोलाचे योगदान दिले असून त्यांचा व्यवसायिक व सामाजिक वारसा कायम स्मरणात राहील.