धुळे दर्पण न्यूज :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त धुळे शहरात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज एकत्र आले आणि खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चरणी प्रार्थना केली की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं.
गेल्या काही आठवड्यांपासून ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा युती होण्यासंदर्भात चर्चा जोर धरू लागली आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी यासंदर्भात बॅनर लावून भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज धुळे शहरात दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र आले आणि वर्धापन दिनानिमित्ताने आई एकविरा देवीला महाआरती अर्पण करून विशेष साकडं घातलं.
प्रार्थनेनंतर एकमेकांना लाडू भरवत शुभेच्छा दिल्या
शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकमेकांना मिठाई भरवत आपुलकीचं दर्शन घडवलं. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. "राज-उद्धव एकत्र या", "महाराष्ट्रासाठी ठाकरे पुन्हा सोबत या" अशा घोषणा परिसरात घुमल्या. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
 |
- Advertisement - |
भाजप-शिंदे गटाला उत्तर देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र यावेत
कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगितलं की, आज महाराष्ट्रात भ्रष्टाचार वाढला आहे, सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. भाजप आणि शिंदे गट सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीला धोका निर्माण करत आहेत. अशा वेळी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणाऱ्या ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही वेळेची गरज आहे.
आई एकविरा ही ठाकरे घराण्याची कुलदेवता
ठाकरे बंधुंची कुलदेवता असलेल्या एकविरा देवीच्या चरणी साकडं घालून कार्यकर्त्यांनी हा आगळा वेगळा उपक्रम राबवला. "हे देवी, महाराष्ट्राला वाचवण्यासाठी ठाकरे बंधूंना एकत्र आण", अशी प्रार्थना अनेकांनी मनोमन केली.
 |
- Advertisement - |
राजकीय रंगात धार्मिक आस्था
या उपक्रमात धार्मिक श्रद्धा आणि राजकीय भावना यांचं अनोखं मिश्रण पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही कोणतीही राजकीय स्टंटबाजी नाही, तर महाराष्ट्राच्या हितासाठी ही खरी भावना आहे.
शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांना वेग
या घटनांमुळे ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांना आणखी वेग मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर खरोखरच राजकारणाच्या पुढे जाऊन एकत्र आले, तर राज्याच्या राजकीय समीकरणात मोठा भूकंप घडू शकतो.
____________________________________________
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩
ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्य |
- Advertisement - |