वडजाई रोड ते १०० फुटी रस्ता अतिक्रमणमुक्त; उद्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते युनिटी सर्कलपर्यंत कारवाई

१०० हून अधिक दुकानांसह घरांचे अतिक्रमण हटविले; मनपाची मोठी कारवाई

  धुळे दर्पण न्यूज :- शहरातील भोला बाजार ते वडजाई रोड दरम्यानच्या १०० फुटी रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणांवर धुळे महापालिकेने मोठी कारवाई करत जेसीबी चालवली. या कारवाईत शंभरहून अधिक दुकाने आणि काही घरांवरील अतिक्रमण हटवण्यात आले. मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सकाळी सुरू केली असून, अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

तीन दिवसांपूर्वीच देण्यात होत्या नोटिसा

  महापालिकेने या भागातील अतिक्रमणधारकांना तीन ते चार दिवसांपूर्वीच नोटिसा बजावल्या होत्या. दुकाने व घरासमोरील पत्र्यांचे शेड, गटारींवर बांधलेल्या संरचना, रस्त्यावर अतिक्रमण करणारे फळे-भाजी विक्रेते, इत्यादींना अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले गेले होते. मात्र बहुतांश नागरिकांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने, अखेर महापालिकेने सक्त कारवाईचा निर्णय घेतला.

- Advertisement -

मनधाने व दलवाण पोलिसांचा बंदोबस्त

  सकाळीच अतिक्रमण पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव आणि त्यांची टीम पोलीस बंदोबस्तात संबंधित ठिकाणी पोहोचली. बाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे पीआय सुरेशकुमार सुसर, पीएसआय पाटील, तसेच आजाद नगर पोलिस ठाण्याचे पीएसआय खान हे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारीही कारवाईदरम्यान उपस्थित होते. काही भागांमध्ये नागरिकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असला तरी पोलिसांनी संयम ठेवत कायदा व सुव्यवस्थेचे भान राखले.

काहींनी घेतली स्वखुशीने माघार

  महापालिकेच्या जेसीबीने अतिक्रमणावर धडक कारवाई सुरू केल्यानंतर अनेक अतिक्रमणधारकांनी घाबरून आपापले साहित्य हटवण्यास सुरुवात केली. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर पत्रे, लोखंडी फ्रेम्स, सिमेंटच्या संरचना यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. यामुळे स्थानिक रहिवाशांनी देखील या कारवाईचे स्वागत केले.

- Advertisement -

उद्या चाळीसगाव रोडवर कारवाई

  महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेअंतर्गत उद्या चाळीसगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून युनिटी सर्कलपर्यंत अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा केलेले अनधिकृत संरचना, गटारींवर बांधलेले प्लॅटफॉर्म्स आणि दुकानदारांनी व्यापलेल्या भागांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

पुढील टप्प्यात संपूर्ण शहरात कारवाई

  महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, धुळे शहरातील सर्व रस्त्यांवर जेथे जेथे अतिक्रमण आढळेल, त्या सर्व ठिकाणी टप्प्याटप्प्याने कठोर कारवाई केली जाणार आहे. अतिक्रमणमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोच, शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढते, म्हणूनच नागरिकांनी स्वखुशीने अतिक्रमण काढावे, अन्यथा जेसीबीचा बडगा सहन करावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -


Advertisement

# Advertisement for Dhuledarpan News

Welcome to Dhule Darpan News!

Stay updated with the latest news and events from Dhule Darpan.

Visit Us Now