अवैध सावकारी प्रकरणात अचल बंबचा परवाना रद्द करा, चौकशीची मागणी – जयेश दुसाणे यांची पत्रकार परिषदेत जोरदार मागणी

 

  धुळे दर्पण न्यूज :- अवैध सावकारी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र बंब यांचा मुलगा अचल बंब यास धुळे जिल्हा नोंदणी व नियमावली कार्यालय (डीडीआर) यांनी दिलेल्या सावकारी परवान्याची चौकशी करून तो तत्काळ रद्द करावा, अशी मागणी मूळ फिर्यादी जयेश दुसाणे यांनी आज धुळे येथील पत्रकार परिषदेत केली.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. दुसाणे यांनी आरोप केला की, “राजेंद्र बंब यांच्या विरोधातील अवैध सावकारी प्रकरणात तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी योग्य तपास केला होता, मात्र त्यांच्या बदलीनंतर प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. उलट या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची परस्पर खरेदी-विक्री करण्यात आली.”

अचल बंबवर डीडीआरचा परवाना, मागे घ्यावादुसाणेंचा आरोप

  जयेश दुसाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "ज्याच्यावर गुन्हा दाखल असलेल्या कुटुंबातील सदस्याला म्हणजे अचल बंबला सावकारीचा परवाना देणे, हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे स्पष्ट लक्षण आहे. डीडीआर कार्यालयाने अचल बंबचा परवाना तत्काळ रद्द करावा व या परवाना देताना कोणी कोणी मध्यस्थी केली, याची स्वतंत्र चौकशी व्हावी."

- Advertisement -

  त्यांनी असा आरोपही केला की, "या प्रकरणात सरकारी वकील आणि तपास अधिकारी सहकार्य करीत नाहीत. त्यामुळेच आजही मुख्य आरोपी व त्यांचे कुटुंबीय खुलेआम आर्थिक व्यवहार करीत आहेत."


इनकम टॅक्स विभागाने केलेल्या कारवाईचा तपशील

  या प्रकरणात २०२२ मध्ये आजादनगर पोलीस स्टेशन येथे राजेंद्र बंब, संजय बंब आणि इतरांविरुद्ध कलम ४०९, ४०६, ४२०, ४६७, ४६८, ३८४, १२० (ब) आणि महाराष्ट्र मनी लेंडिंग (रेग्युलेशन) अ‍ॅक्ट २०१४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  या कारवाईदरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) धुळे येथील विविध ठिकाणी छापे टाकून रोख रक्कम, मौल्यवान दागिने व महत्त्वाचे कागदपत्रे जप्त केली होती. या जप्तीबाबत इनकम टॅक्स विभाग नाशिकने न्यायालयात कलम १३२A अंतर्गत मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता.


जप्तीची आकडेवारीधक्कादायक रक्कम

 कारवाईदरम्यान खालीलप्रमाणे जप्ती करण्यात आली होती:

  • रोख रक्कम : ₹१२,२४,१०,७६०/-
  • सोने : ₹६,०९,५४,९४४/-
  • चांदी : ₹५,२८,३०५/-
  • फिक्स डिपॉझिट (FDs) : २९७२ FD – एकूण रक्कम ₹३,७१,७४,९९८/-

  सदर मालमत्ता अनेक बँक लॉकर व विविध व्यक्तींच्या नावे होती, मात्र व्यवहार राजेंद्र बंब आणि त्यांच्या कुटुंबियांनी केले होते. लॉकरमध्ये मिळालेल्या रोख रक्कम व दागिन्यांवरून या प्रकरणात मोठ्या प्रमाणात काळा पैसा गुंतवला गेला असल्याची शंका इनकम टॅक्स विभागाने व्यक्त केली आहे.

- Advertisement -

सावकारी परवाना देताना अनियमितता?

  जयेश दुसाणे यांच्या मते, “एकीकडे तपास सुरू असताना व मालमत्ता जप्त होत असताना, अशा व्यक्तीच्या मुलाला सावकारी परवाना दिला जाणे म्हणजे कायद्याला थट्टा वाटावी अशी परिस्थिती आहे. लोकांचे शोषण करणाऱ्या कुटुंबाला कायद्याचे संरक्षण दिले जात असल्याचा आभास या प्रकारावरून होतो.”

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."


प्रशासनाकडे ठोस मागण्या

 दुसाणे यांनी प्रशासनाकडे खालील मागण्या मांडल्या:

  1. अचल बंब याचा सावकारी परवाना तत्काळ रद्द करावा.
  2. परवाना देताना कोणत्या अधिकाऱ्यांची भूमिका होती, याची स्वतंत्र चौकशी करावी.
  3. गुन्ह्यातील जप्त मालमत्तेची पुनरपडताळणी करून तिचा सर्वसामान्य नागरिकांसाठी वापर कसा करता येईल, याची कार्यवाही करावी.
  4. प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष चौकशी समिती नेमावी.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -


Advertisement

# Advertisement for Dhuledarpan News

Welcome to Dhule Darpan News!

Stay updated with the latest news and events from Dhule Darpan.

Visit Us Now