जुने धुळे परिसरात कौटुंबिक वादातून थरार; दिरावर चाकूहल्ला, ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 


  धुळे दर्पण न्यूज :- शहरातील जुने धुळे परिसरात कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका सुनेच्या माहेरच्या ११ जणांनी सासू आणि नणंद यांना मारहाण केली असून, या वादात मध्यस्थी करणाऱ्या दिरावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  ही घटना १७ जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. शिवकुमार राजेंद्र फुलपगारे (वय २७) या युवकावर चाकूहल्ला करण्यात आला असून, त्यांच्या मानेवर गंभीर जखम झाली आहे. सध्या ते धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. घटनेनंतर शिवकुमार फुलपगारे यांनी १८ जून रोजी पहाटे तीन वाजता आझाद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  प्राप्त माहितीनुसार, कौटुंबिक वादातून सुनेच्या माहेरच्यांनी सासू आणि नणंद यांना घरात घुसून मारहाण केली. यावेळी घरात उपस्थित असलेल्या दिराने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या मानेवर गंभीर इजा झाली आहे.

- Advertisement -

  या प्रकरणात जखमी शिवकुमार यांची बहीण भाग्यश्री फुलपाखरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, "माझ्या भावावर झालेला हा हल्ला साधा भांडण नव्हे तर हत्या करण्याचा प्रयत्न होता. आरोपींवर अर्ध्या खुनाचा (हाफ मर्डर) गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी."

  तसेच या प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोपही भाग्यश्री यांनी केला आहे. त्यांनी पोलिस प्रशासनाला निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  दरम्यान, आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती मिळत आहे.

__________________________________________________
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -


Advertisement

# Advertisement for Dhuledarpan News

Welcome to Dhule Darpan News!

Stay updated with the latest news and events from Dhule Darpan.

Visit Us Now