वडजाई रोड अंडरपासजवळील सर्विस रस्त्याची दयनीय अवस्था; समाजवादी पार्टीने 'सदभाव टोलवे' व्यवस्थापनास निवेदन दिले

 

  धुळे दर्पण न्यूज :- शहरातील वडजाई रोड हा एक महत्त्वाचा व मुख्य रहदारीचा मार्ग असून, या रस्त्यावरील अंडरपास जवळील सर्विस रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठे खड्डे पडले असून, ते खड्डे आता पावसाचे पाणी साचल्यामुळे अधिक धोकादायक झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धुळे महानगर समाजवादी पार्टीच्या शिष्टमंडळाने सोनगीर येथील 'सदभाव टोलवे' व्यवस्थापनास दि. १८ जून रोजी निवेदन सादर केले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  या निवेदनात नमूद करण्यात आले की, वडजाई रोडवरील अंडरपास परिसर हा धार्मिक, शैक्षणिक आणि रहिवासी दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील असून, याच मार्गावर मुस्लिम कब्रस्तान, शाळा व महाविद्यालय आहेत. परिणामी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, दफनविधीसाठी येणारे नागरिक आणि स्थानिक रहिवासी यांची या मार्गावर मोठी वर्दळ असते. मात्र, अंडरपास व सर्विस रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

"सदभाव टोलवे" व्यवस्थापनाचे धोरण निष्काळजी
  समाजवादी पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, सदभाव टोलवे व्यवस्थापनाचे अंडरपास व सर्विस रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे असलेले धोरण हे अत्यंत उदासीन व निष्काळजी आहे. बोगद्याच्या दोन्ही तोंडावर असलेले खोल खड्डे हे केवळ वाहतुकीसाठी अडथळा ठरत नाहीत, तर अपघाताच्या संभावनाही वाढवत आहेत. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनते.

  तरी सदर खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत व अंडरपासजवळील संपूर्ण सर्विस रस्ता काँक्रिटीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी समाजवादी पार्टीने केली आहे. अन्यथा, सदभाव टोलवे व्यवस्थापनाच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदन देताना अनेक पदाधिकारी उपस्थित
  या निवेदनप्रसंगी धुळे महानगर समाजवादी पार्टीचे महानगर प्रमुख गुड्डूभाई काकर यांच्यासह जमील मंसूरी, अकिल अन्सारी, अमीन पटेल, गुलाम कुरेशी, इम्रान शेख, अकिल शाह, नविद अख्तर, निहाल अन्सारी, मोहसीन शेख, इरफान मनियार, नाजिम शेख, अली अझर खान, रशीद शहा, अब्दुल अजिज अन्सारी, अशपाक पिंजारी, इरफान शाह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

  शहराच्या दैनंदिन जीवनात अडथळा ठरणाऱ्या अशा प्रश्नांबाबत स्थानिक प्रशासन आणि टोल व्यवस्थापनाने तत्काळ लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा समाजवादी पक्ष संघर्षाच्या पवित्र्यात उतरेल, असा स्पष्ट इशारा या माध्यमातून देण्यात आला आहे.

___________________________________________

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

Advertisement

# Advertisement for Dhuledarpan News

Welcome to Dhule Darpan News!

Stay updated with the latest news and events from Dhule Darpan.

Visit Us Now