धुळे दर्पण न्यूज :- महावितरणच्या तपासणीत धुळे शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वीजचोरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वीजचोरीचा एकत्रित आकडा तब्बल अडीच लाख रुपयांच्या घरात असून, महावितरणने हे प्रकरण गंभीरतेने घेत कारवाई सुरू केली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
प्राप्त माहितीनुसार, शहरातील एकतानगर येथील प्लॉट क्रमांक ३९ मध्ये राहणारे सचिन साजन वाडीले यांनी आपल्या घरगुती वीज मीटरमध्ये फेरफार करून महावितरणच्या महसुलाची मोठ्या प्रमाणात हानी केली. त्यांच्या कडून ७ हजार ५३९ युनिट्स इतकी वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले असून, त्याची आर्थिक किंमत १ लाख ४६ हजार ८२० रुपये इतकी आहे.
त्याचप्रमाणे, एकलव्य हाउसिंग सोसायटी मधील ज्योतिबा कैलास दीपक यांनी देखील वीज मीटरमध्ये बेकायदेशीर छेडछाड करून ६ हजार ६९ युनिट्स इतकी वीज वापरल्याचे समोर आले आहे. त्यांची वीजचोरीची रक्कम १ लाख १४ हजार १३१ रुपये इतकी आहे.
![]() |
- Advertisement - |
दोन्ही प्रकरणांमध्ये महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजयकुमार निशिकांत पवार यांनी संबंधितांविरोधात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी महावितरणच्या अहवालाच्या आधारे दोघांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा आणि फौजदारी कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशा प्रकारे मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत असून, येत्या काळात अजून तपासणी मोहीमा राबवून अशा प्रकरणांचा शोध घेतला जाणार आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वीजचोरीसारख्या गंभीर गुन्ह्याला रोखण्यासाठी महावितरणकडून जनजागृती आणि तपासणी अधिक तीव्र केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
__________________________________________