प्रभाग क्र. १९ मध्ये गटाराच्या कामाची मागणी तीव्र; नागरिकांचे निवेदन आयुक्तांकडे

 

  धुळे दर्पण न्यूज :- शहरातील प्रभाग क्रमांक १९ मधील अंबिका नगर परिसरातील नागरिकांनी सांडपाण्याच्या समस्येवरून तक्रार व्यक्त करत महापालिका प्रशासनाकडे तातडीने गटाराचे काम करण्याची मागणी केली आहे. विशेषतः मस्जिदे ईब्राहीमजवळील निसार यांचे घर ते जिशान काझी व पत्रकार सैफ अन्सारी यांच्या घरापर्यंत सुमारे ६० मीटर लांबीचे गटार तयार करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  सदर मागणी धुळे महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर पीरन शाह, निसार अहमद, सैफ अन्सारी, जिशान काझी, समीर शाह, जुनैद शेख व रेहान अन्सारी यांची नावे असून, संबंधित परिसरातील नागरिकांनी एकवटून ही समस्या मांडली आहे.

  गटार व्यवस्था नसल्याने परिसरात सतत सांडपाण्याचा साठा होतो आणि रस्त्यावर दुर्गंधी पसरते. परिणामी, या भागात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. डासांचा उपद्रव वाढला असून, पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी नागरिक यांच्यासाठी हा प्रश्न अधिकच त्रासदायक ठरत आहे.

- Advertisement -

 नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा तोंडी तक्रारी करण्यात आल्या असून, नगरसेवकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत हा प्रश्न मांडण्यात आला होता. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आता थेट आयुक्तांच्या दालनात धाव घेत निवेदन देण्यात आले आहे.

  या परिसरात गटार नसल्यामुळे केवळ सांडपाण्याचाच प्रश्न नाही, तर सार्वजनिक स्वच्छतेचा आणि सुरक्षिततेचाही मुद्दा निर्माण झाला आहे. रस्त्यावर साचलेले पाणी व किचकट चिखलामुळे अपघाताची शक्यता कायम असते. शिवाय परिसरातील दुकानदारांनाही या घाण व दुर्गंधीमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  निवेदनाद्वारे नागरिकांनी हा प्रश्न अधिक वेळ दुर्लक्षित झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून गटार बांधकामाच्या कामास मंजुरी द्यावी व प्रत्यक्ष काम हाती घ्यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

_______________________________________________

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -



Advertisement

# Advertisement for Dhuledarpan News

Welcome to Dhule Darpan News!

Stay updated with the latest news and events from Dhule Darpan.

Visit Us Now