धुळे अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात आज विशेष कार्यशाळा

 

  धुळे दर्पण न्यूज :- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची (SC/ST Atrocity Act) प्रभावी अंमलबजावणी, सामाजिक समरसता व जातीय सलोखा वृद्धिंगत करण्याच्या हेतूने एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा बुधवार, दिनांक १८ जून २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळील बहुउद्देशीय सभागृह, एस.आर.पी.एफ. पेट्रोल पंपासमोर, साक्री रोड, धुळे येथे पार पडणार आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेसहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या उपक्रमाविषयी माहिती देताना समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे यांनी सांगितले की, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये बार्टीमार्फत विभागीय व जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत.

- Advertisement -

  कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी विविध प्रशासकीय व कायदेशीर विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गृह विभागातील पोलीस अधिकारी, नागरी हक्क संरक्षण शाखेतील अधिकारी, पोलीस निरीक्षक, सामाजिक न्याय विभागातील जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य, विधी व न्याय विभागातील सरकारी अभियोक्ता, गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस अधिकारी, तसेच सामाजिक न्याय विभागातील विविध पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा समावेश आहे.

  कार्यशाळेमध्ये अॅट्रासिटी कायदा १९८९सुधारित अधिनियम २०१६ यांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया, न्यायालयीन बाबी, कायद्याचे समाजावर होणारे परिणाम, तसेच जनजागृती आणि सामाजिक समतेचा संदेश कसा पोहोचवावा, यावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  कार्यशाळेसाठी उपस्थित राहणाऱ्यांनी ठीक सकाळी १० वाजता आपल्या उपस्थितीची नोंद करावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे तसेच बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे यांनी केले आहे.
____________________________________________

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -



Advertisement

# Advertisement for Dhuledarpan News

Welcome to Dhule Darpan News!

Stay updated with the latest news and events from Dhule Darpan.

Visit Us Now