मोकाट जनावरे दुकानात घुसू लागली; पिंपळनेरकरांचा संताप अनावर

 

  धुळे दर्पण न्यूज :- पिंपळनेर शहरातील सटाणा रोड हा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्ता अखेर काही प्रमाणात सुटला असला तरी आता या रस्त्यावर नव्या समस्येने डोके वर काढले आहे. शहरातील मोकाट गुरे रस्त्यावर फिरतच नाहीत, तर थेट दुकानातही घुसू लागली आहेत. यामुळे व्यापारी वर्ग, वाहनचालक व पादचाऱ्यांचे हाल सुरू झाले आहेत. विशेषतः महिला व शालेय विद्यार्थी यांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  भर बाजारपेठेत मोकाट गुरांचा मुक्त संचार वाढल्याने अनेक वेळा अपघातासारख्या घटना घडत आहेत. नुकत्याच घडलेल्या घटनेत, एका दुकानात घुसलेल्या मोकाट बैलाने एका महिलेला धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

  शहरात फिरणारी ही गुरे अनेकदा रस्त्यावर बसून राहतात, ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यातच काही वेळा ही जनावरे अचानक धावत येतात, ज्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध नागरिक व महिला यांच्यावर धोका निर्माण होतो. वाहनचालकांनाही याचा त्रास होत असून वाहने थांबवून ठेवावी लागतात किंवा अपघात टाळण्यासाठी जोरात ब्रेक दाबावे लागतात.

- Advertisement -

  नगर परिषद व पशुसंवर्धन विभाग या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने पिंपळनेरकरांमध्ये अस्वस्थता आहे.

  स्थानिक नागरिकांचे व व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, "पशुपालकांनी आपल्या जनावरांची जबाबदारी घेतली पाहिजे. जर ते सक्षम नसतील, तर नगर परिषद आणि गोरक्षण संस्था यांनी अशा मोकाट जनावरांना तात्काळ पकडून पांजरापोळमध्ये ठेवावे. अन्यथा नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत राहील."

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या पार्श्वभूमीवर पिंपळनेर नगर परिषदेला लवकरात लवकर उपाययोजना करावी लागणार आहे. अन्यथा, नागरिकांमध्ये असलेला रोष आंदोलनाच्या मार्गानेही व्यक्त होऊ शकतो. सुरक्षितता आणि सार्वजनिक शिस्त या दोन्ही दृष्टीने मोकाट जनावरांच्या समस्येवर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक ठरत आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -


Advertisement

# Advertisement for Dhuledarpan News

Welcome to Dhule Darpan News!

Stay updated with the latest news and events from Dhule Darpan.

Visit Us Now