उघड्या टाकीत पडलेल्या गायीला गोरक्षकांनी वाचवले; निष्काळजीपणावर नागरिकांचा संताप

 

  धुळे दर्पण न्यूज :- पिंपळनेर शहरातील इंदिरा गांधी कन्या विद्यालयाच्या बाजूला असलेल्या एका मंगल कार्यालयाच्या अर्धवट बांधकामाच्या परिसरात शौचालयासाठी खोदण्यात आलेल्या उघड्या टाकीत एक गाय पडल्याची घटना घडली. स्थानिक गोरक्षकांच्या तत्परतेमुळे ही गाय सुखरूप वाचली असली, तरी या घटनेने शहरात खळबळ माजवली असून अशा उघड्या व धोकादायक ठिकाणांविरोधात त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुजाण नागरिकांकडून होत आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  प्राप्त माहितीनुसार, संबंधित टाकी अर्धवट स्थितीत असून ती खुलेआम तसेच असुरक्षित स्वरूपात सोडण्यात आली आहे. या टाकीत पावसाचे पाणी साचल्याने त्यावर शेवाळ आणि गवत उगवले होते. पिण्यासाठी पाणी शोधत गेलेली गाय या टाकीत पडल्याने ती पाण्यात अडकून गेली होती. गायीच्या गळ्यापर्यंत पाणी भरल्यामुळे तिचा जीव धोक्यात आला होता.

- Advertisement -

  घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते दीपक धायबर यांनी तातडीने जे.सी.बी. मशीनची व्यवस्था केली. त्याच्या मदतीने व गोरक्षकांच्या सहकार्याने दोऱ्याच्या सहाय्याने गायीला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. मयुर कासार, हरीश गुजराती, बाळु मुसळे, परेश शंखपाळ, भावडू प्रजापती, पीयूष कोठावदे, चेतन पगारे, शुभम सुर्यवंशी, दिनेश जैन यांचे या कार्यात विशेष योगदान राहिले. सर्वांचे समाजातून कौतुक होत आहे.

  दरम्यान, जर या उघड्या टाकीत लहान मुले पडली असती, तर मोठा अनर्थ ओढवला असता, अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कॉलनीजवळ असलेल्या अशा असुरक्षित जागा सार्वजनिक सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकतात. त्यामुळे उघडी टाकी खुली ठेवणाऱ्या व्यक्तींवर तसेच मोकाट जनावरे सोडणाऱ्या बेजबाबदार मालकांवर देखील संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तीव्र मागणी करण्यात येत आहे.

  पिंपळनेर शहरात मोकाट गायी, गुरे यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक वेळा या जनावरांचे मालक स्वतः जबाबदारी झटकून त्यांना मोकाट सोडतात. गाय व्याल्यानंतर ती सोडून दिली जाते आणि त्यानंतर गोरक्षकांनी फोटोसह सोशल मीडियावर माहिती देत त्या गाईला शोधण्याचे आवाहन केले जाते. मात्र अशा गायी गोशाळेत जमा केल्या जाव्यात, असेही मत व्यक्त होत आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरातील अशा धोकादायक ठिकाणांची नोंद घेऊन ते सुरक्षित करणे, मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवणे, आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

_______________________________________

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -


Advertisement

# Advertisement for Dhuledarpan News

Welcome to Dhule Darpan News!

Stay updated with the latest news and events from Dhule Darpan.

Visit Us Now