शिक्षकांच्या कमतरतेविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन: टाकरखेडा जिल्हा परिषद शाळेला कुलूप, १ जुलैपर्यंत शिक्षक नेमण्याचे लेखी आश्वासन

 

  धुळे दर्पण न्यूज :- शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न गंभीर होत चालल्याने ग्रामस्थांनी याविरोधात आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून आंदोलन करण्यात आले. सुमारे दोन तासांनी गटशिक्षणाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी १ जुलै २०२५ पर्यंत शाळेत कायमस्वरूपी शिक्षक नियुक्तीचे लेखी आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  टाकरखेडा जिल्हा परिषद शाळेत एकूण पाच शिक्षकांची पदे असून त्यापैकी सध्या केवळ तीन शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेत सात वर्ग भरवले जातात. त्यातही एक शिक्षक दुसऱ्या शाळेचे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असल्याने प्रत्यक्षात दोनच शिक्षक उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण व भवितव्य अंधारात जात असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

- Advertisement -

  ग्रामस्थांनी यापूर्वीही प्रशासनाकडे शिक्षक भरतीसाठी अनेकदा निवेदने दिली होती. मात्र, ठोस कार्यवाही न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकले. सामाजिक कार्यकर्त्या अनिता गिरासे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडले.

  घटनेची माहिती मिळताच शिंदखेडा येथील गटशिक्षणाधिकारी सोनवणे हे शाळेत दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून सद्यस्थितीची माहिती घेतली. यावेळी ग्रामस्थांनी शाळेतील धोकादायक स्लॅब, शौचालयांची खराब अवस्था आणि पायाभूत सुविधांच्या अभावाकडेही लक्ष वेधले.

  अखेर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी १ जुलै २०२५ पर्यंत शाळेत नियमित शिक्षक नियुक्त करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास शाळेत प्रवेशोत्सव पार पडला.

  शाळेतील शिक्षकांच्या कमतरतेसह इतर समस्यांकडे वेळोवेळी लक्ष वेधूनही प्रशासनाकडून दिरंगाई केली जात असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वेळीच शिक्षक नियुक्ती व्हावी, अशी जोरदार मागणी यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे.

  धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने याप्रकरणी तत्काळ लक्ष देऊन टाकरखेडा शाळेत शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

_____________________________________

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -


Advertisement

# Advertisement for Dhuledarpan News

Welcome to Dhule Darpan News!

Stay updated with the latest news and events from Dhule Darpan.

Visit Us Now