मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १.२५ लाखांची मदत; आ. राम भदाणे यांच्या प्रयत्नांना यश

 

  धुळे दर्पण न्यूज :- धुळे तालुक्यातील वडणे व नंदाळे येथील दोन गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण १ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. ही मदत धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र (राम) भदाणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळवून देण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या हालाखीच्या परिस्थितीत असलेल्या या रुग्णांना ही मदत दिलासा देणारी ठरली आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  वडणे येथील रहिवासी मयूर दगडू शिंदे हे अज्ञात मूळ असलेल्या पायरॅक्सिया (Pyrexia of Unknown Origin) या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर देवपूर येथील शतायू हॉस्पिटल तसेच श्रीमती कमलाबाई अजमेरा आयुर्वेद महाविद्यालय, दयासागर शैक्षणिक संकुल येथे उपचार सुरू होते. मात्र त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे उपचारात अडथळा निर्माण झाला होता. याची माहिती आमदार राम भदाणे यांना मिळताच त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ७५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करून घेतले. त्यामुळे रुग्ण शिंदे यांच्या उपचारात मोठा दिलासा मिळाला आहे.

  दुसऱ्या प्रकरणात नंदाळे येथील रहिवासी दत्तात्रय शिवाजी पाटील हे काही काळापासून नाशिकमध्ये उपचार घेत होते. उपचाराचा खर्च वाढत चालल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आर्थिक बोजा पडला होता. त्यांनी आमदार भदाणे यांच्याशी संपर्क साधत मदतीची विनंती केली. यावेळीही आमदार भदाणे यांनी तत्काळ हालचाल करत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० हजार रुपयांची मदत मंजूर करून दिली.

- Advertisement -

  धुळे तालुक्यातील अनेक गरजू रुग्णांना यापूर्वीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत मदत मिळवून देण्यात आमदार राम भदाणे हे आघाडीवर आहेत. त्यांनी या निधीचा वापर करून गरीब व गरजू रुग्णांच्या उपचाराचा प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. वडणे व नंदाळे येथील रुग्णांना मिळालेल्या मदतीमुळे संपूर्ण तालुक्यातून आमदार भदाणे यांच्या कार्याची स्तुती होत असून, ग्रामस्थांकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहेत.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  ही मदत म्हणजे फक्त आर्थिक पाठबळ नसून, गरजूंना जीवदान देणारा हात असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. आमदार भदाणे यांचे हे सामाजिक कार्य इतर लोकप्रतिनिधींनाही प्रेरणा देणारे ठरत आहे.

___________________________________________

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -


Advertisement

# Advertisement for Dhuledarpan News

Welcome to Dhule Darpan News!

Stay updated with the latest news and events from Dhule Darpan.

Visit Us Now